शिरपूर : १ ऑगस्ट रोजी महसूल दिवस गेल्या वर्षभरात विविध प्रकारची शासकीय कामे व योजनांची अंमलबजावणी उत्कृष्टपणे केल्याबद्दल धुळे जिल्ह्यातून 'उत्कृष्ट तहसीलदार' शिरपूरचे तहसिलदार आबा महाजन यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
गेल्या वर्षभरात कोविड काळात शिरपूर तालुक्यातील खेडोपाडी, आदिवासी पाड्यांवर जाऊन तहसिलदार आबा महाजन यांनी कर्मचाऱ्यांसोबत अहोरात्र काम केले. कोविड सोबतच नित्याची महसुली कामांमध्ये देखील गुणवत्ता राखत नियोजनपूर्वक काम केले. म्हणुन धुळे येथे १ ऑगस्ट रोजी माजी केंद्रीयमंत्री खा. डाॅ सुभाष भामरे यांचा हस्ते तहसिलदार आबा महाजन सन्मान पत्र व शाल, श्रीफळ देवुन गौरविण्यात आले. यावेळी आ. काशिराम पावरा, जिल्हाधिकारी जलेश शर्मा, धुळे प्रांतधिकारी श्रीमती तृप्ती डोळमले, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड आदि उपस्थित होते.