विषमुक्त अन्नासाठी नैसर्गिक शेती

    दिनांक : 19-Aug-2021
Total Views |
 नगरदेवळा येथील शेतकरी नामदेव महाजन यांची शेती पद्धत विज्ञानाद्वारे विषमुक्त सिद्ध झाली
 
नगरदेवळा : रासायनिक खते व रासायनिक किटकनाशकांचा होणारा प्रमाणापेक्षा अधिक वापर व त्यामुळे सदर किटकनाशकांचा अंश पिकांमध्ये उतरून तो आहाराद्वारे मानवी शरीरात जाऊन मानवास मधुमेह, रक्तदाब, किडनी, यक्रुताद्वारे आजार, पक्षघात, कँसर, मानसिक आजार यासारख्या अनेक व्याधींचा त्रास भोगावा लागत असल्याने या विषारी अन्नघटकांबाबत सर्व जगातील बुद्धिवंत, विचारवंत व शास्त्रज्ञ चिंता व्यक्त करीत असतात. अशातच नगरदेवळा येथील शेतकरी नामदेव विश्राम महाजन यांच्या शेतातील लिंबू पिक हे पुर्णपणे विषमुक्त व नैसर्गिक असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने ही सर्वांसाठी आनंदाची व आशादायक बातमी ठरली आहे.
  
Namdev Mahajan_1 &nb
 
नामदेव महाजन हे कोणतेही रासायनिक खत व रासायनिक किटकनाशक न वापरता, केवळ देशी वंशाच्या गाईच्या गोमूत्रापासून शेतातच बणवलेल्या जिवाम्रुताचाच खत म्हणून वापर करतात, जमिनीतील कचरा, गवत, तण कापून जमिनीवर आच्छादन करतात व किटकनाशक म्हणून वापर करून विषमुक्त नैसर्गिक पद्धतीने शेती करतात व केळी, लिंबू, भाजीपाला, धान्य अशा पिकांचे भरघोस व मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात.
 
नामदेव महाजन यांच्या शेतातील लिंबू पिकाचे नाशिक येथील अश्वमेध लँबोरेटरी मध्ये सलग ५ दिवस चाललेल्या रासायनिक प्रुथक्करणाद्वारे व एकूण २३ किटकनाशकांच्या शास्रीय पद्धतीने घेतलेल्या चाचण्यांचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून या सर्व किटकनाशकांच्या धोकादायक पातळीपेक्षाही १०० ते ५०० पट कमी, म्हणजे शून्य प्रमाण आढळून आल्याने नामदेव महाजन यांच्या शेतातील लिंबू हा पुर्णपणे विषमुक्त व नैसर्गिक असल्याचे सिद्ध झाले आहे.
 
नामदेव महाजन यांचे स्वत:चे साधारण १०.५ एकर व बटाईवर घेतलेले १ एकर क्षेत्र आहे. त्यांच्या शेतीत ते कोणतेही रासायनिक खत व किटकनाशकांचा वापर न करता देशी गाईच्या गोमूत्रापासून जिवाम्रुत व शेणापासून घन जिवाम्रुत बनवतात सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती पद्धत नुसार करतात. गेल्या अनेक वर्षांपासून रासायनिक खतांऐवजी हे दोन पदार्थच वापरतात. रासायनिक पदार्थांचा वापर करीत नसल्याने त्यांच्या पिकांवर हानिकारक किटक, रोगराई सहसा येत नाही. त्यामुळे मित्र किटक भरपूर प्रमाणात दिसून येतात. तसेच किटकनाशकांची गरज पडलीच तर जिवाम्रुत व आंबट ताकाची फवारणी करतात. शेतातीलच लिंबोळी सारख्या वनस्पतींचा अर्क तसेच दशपर्णी अर्क बणवून फवारणी केली जाते. त्यामुळे उपयोगी मित्र किटकांचा नाश न होता, त्यांचे मोठ्या प्रमाणात संवर्धन होते. रासायनिक पदार्थांचा वापर बंद असल्याने जमिनीत गांडूळांची संख्या अफाट प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे त्यांच्या जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाणात वाढले असून पिकांचे जास्त प्रमाणात उत्पादन येते. त्यांच्या शेतातील लिंबूची बारमाही तोड चालते व बारमाही हातात पैसा येत असतो.
 
त्यांच्या शेतातील प्रत्येक लिंबूची बाहेरील त्वचा ही अतिशय पातळ असून, रसाचे प्रमाण भरपूर असते विशेष रासायनिक लिंबू पेक्षा या लिंबूत रसाचे प्रमाणही जास्त मिळते व लिंबूच्या कातडी (ग्लेझ) ही अतिशय चमकदार दिसते. यासोबतच त्यांच्या शेतातील पक्षी थांब्याकरीता देशी व्रुक्षांचे संगोपन, जलपुनर्भरणसाठी भूमिगत (अंडरग्राऊंड) शोषखड्डा, शेतातील अनेक शोषखड्डे, बोरपुनर्भरण, बांधांना सिल्व्हर ओक व्रुक्षांची वनराई इ. अनेक गोष्टी पाहण्यासारख्या व अनुभवण्यासारख्या असून शोषखड्डा, जिवाम्रुत फिल्टर जाळी, पाईपलाईन द्वारे जिवाम्रुतपिकांना देण्याची सोपी पद्धत इ. अनेक गोष्टी प्रयोगशील शेतकरी नामदेव महाजन यांनी स्वतःच्| शोधून काढल्या आहेत. परिपूर्ण, सधन व प्रयोगशील शेती असलेल्या त्यांच्या शेतीस दरवर्षी मोठ्या संख्येने शेतकरी, अधिकारी व अभ्यासक भेट देत असतात. रासायनिकच्या अतिवापरामुळे त्रस्त झालेल्या मानवजातीसाठी सदर विषमुक्त रिपोर्ट हा आशेचा किरण ठरला असून अन्य शेतकऱ्यांना देखील नैसर्गीक शेतीतून समृद्ध होण्याचा मार्ग यातून मिळाणार आहे.