म्हसदी, ता.साक्री : पदवीधर मतदारसंघात प्रतिनिधित्व करण्याची संधी खानदेशात अजूनही कोणालाही मिळाली नाही. त्यासाठी धुळे जिल्ह्यातील उमेदवारासाठी सर्व ताकदीनिशी भारतीय जनता पक्ष बळ लावणार आहे. चालून आलेल्या संधीच सोनं करा, असे आवाहन माजी आमदार तथा भाजपाच्या भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी केले. धनदाई देवी मंदिर मंगल कार्यालयात नाशिक विभाग पदवीधर नावनोंदणी अभियान मोहिमेचा आरंभ पवार यांच्या हस्ते झाला तेव्हा ते बोलत होते.
भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, सरपंच शैलजा देवरे, उपसरपंच चंद्रकांत देवरे, आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन तथा इच्छुक उमेदवार धनराज विसपुते, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र विसपुते, परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे, काळगावचे सरपंच संजय भामरे, उज्ज्वला हाके, भाग्यश्री ढाकणे, अशोक चोरमले, संगीता विसपुते, सचिन बेडसे (ककाणी), नवनाथ ढगे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष महेंद्र देवरे, धनदाई देवी तरुण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष सुभाष देवरे, सचिव महेंद्र देवरे, ज्येष्ठ संचालक गंगाराम देवरे, हिंमतराव देवरे, निरंजन देवरे, राकेश देवरे, बाजार समितीचे संचालक दीपक जैन, बारक बेडसे, शिवाजी शैक्षणिक संस्थेचे सचिव रमेश देवरे, माजी सरपंच कुंदन देवरे, राजधर देसले, वसंत देवरे, निवृत्त शिक्षक डी. डी.देवरे, डी. टी. देवरे उपस्थित होते.
६१ हजार मतदारांशी थेट संपर्क साधल्याची माहिती धनराज विसपुते यांनी यावेळी दिली. पुरुषोत्तम काळे यांनी प्रास्ताविक केले. ऍड. सीमा कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. सुनीता देवरे यांनी आभार मानले. वसंत देवरे, अशोक विसपुते, कैलास विसपुते, दीपक विसपुते आदींनी संयोजन केले.
म्हसदीकरांकडून विजयाचा संकल्प
विसपुते यांनी स्वतःच्या जन्मभूमीत धनदाई देवीला साकडे घालत मतदान नावनोंदणी अभियानास आरंभ केल्याने म्हसदीकरांचा आत्मविश्वास दुणावला आहे. घरातील सदस्य उमेदवार समजून निवडून आणू असा संकल्प सर्व ग्रामस्थांनी यावेळी केला. कार्यक्रमात गावातील प्रत्येक समाजातील व्यक्तींचा पवार यांच्या हस्ते विसपुते परिवाराने गौरव केला.