दानात दान सर्वश्रेष्ठ रक्तदान.... !

    दिनांक : 14-Aug-2021
Total Views |
जन्मदिनी करा रक्तदान कुणाचे तरी प्राण वाचवून
स्वतःचे करा मोठे समाधान
 
 Rakatdan_1  H x
 
जन्म दिवशी आनंदाच्या क्षणी
रक्तदान करील हेच माझ्या मनी
 
जन्म दिवशी नाही आनंदाला तोटा
रक्तदान करावे हा असावा भाव मोठा
 
जन्म दिवशी औक्षण करून धूपदिपाला या वास
रक्तदानानेच पूर्ण होतो तुमचा हा ध्यास
 
जन्म दिवशी स्मरण करावे देवाचे
रक्त दानाने समाधान करावे मनाचे
 
जन्म दिवशी आशिर्वाद घ्यावे मोठ्यांचे
करावे रक्तदानाने कार्य पुण्याचे
 
तोंड करावे गोड जन्म दिवशी
रक्तदान करूच अशी खूण गाठ मनाशी
 
नवीन कपडे घाला केक कापा
रक्तदान करून मित्रापुढे ठेवा आदर्श सोपा
 
ताई वहिनींनी करावे जन्म दिवशी रक्तदान
इतर स्त्रियांना ते बघून वाटेल अभिमान
 
रक्तदान करावे हा आहे थोर विचार
शालेय मुले मुली आजच करतील त्याचा स्विकार
 
सौ. प्रभा एस. कुळकर्णी,
एएनएम, जळगाव