पावसाळ्यात आहार असावा हलका

    दिनांक : 29-Jul-2021
Total Views |
पावसाळ्यात आहार असावा हलका
पावसाळा सुरू झाला की, आपल्याला निरनिराळ्या आजारांचे त्रास सुरू व्हायला लागतात. त्यातले बरेच आजार पोटामुळे निर्माण होतात आणि पोेटाचे आजार जंतूंचा संसर्ग आणि चुकीचा आहार यातून निर्माण होतात. त्यामुळे पावसाळ्यात आहाराच्या बाबतीत काही पथ्ये पाळण्याची गरज आहे. यासंबंधात आहार तज्ज्ञाकडून दिल्या जाणार्‍या खास टिप्स् खालीलप्रमाणे आहेत.
 
 

aahar_1  H x W: 
पावसाळ्यात निरनिराळ्या भाज्यांचे सूप प्राशन करणे फायदेशीर ठरते. कारण या सुपांमध्ये पोषण मूल्ये भरपूर असतात. काही पोषण मूल्यांच्या अभावामुळे सर्दी आणि फ्ल्यूसारखे आजार बळावतात. परंतु भाज्यांचे सूप खाल्ल्याने या आजारापासून बचाव तर होतोच, पण आपले सर्वसाधारण आरोग्य आणि प्रतिकार क्षमता वाढते.
पावसाळ्यात चहा घ्या, परंतु शक्यतो हर्बल टी प्या. त्यामुळे फ्ल्यूचा धोका टळतो. हर्बल टी पचनशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरत असतो. आपल्या जेवणामध्ये पातळ अन्नापेक्षा घट्ट अन्न पदार्थ किंवा निमपातळ अन्नपदार्थ जास्त घ्यावे. कारण पातळ अन्न पदार्थातून रोगजंतूंचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.