नंदुरबारात ६२ लाखांचे मद्य जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

    दिनांक : 09-Dec-2021
Total Views |
नंदुरबार : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष भरारी पथकाने ८ डिसेंबरच्या मध्यरात्री बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर परराज्यातील विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या कंटनेरसह सुमारे ६२ लाख ७६ हजार ४८० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.


Nandurbar11_1   
 
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक डी.एम. चकोर यांना मिळालेल्या माहितीनुसार जिजे- 5 एटी- 6007 क्रमांकाच्या पॅकबंद कंटेनर वाहनांची तपासणी केली असता सदर वाहनांमध्ये परराज्यातील विदेशी मद्याचे एकूण ४८८ बॉक्स आढळून आले. वाहनासह मनोजकुमार मखनलाल बिश्नोई यास अटक करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, अंवदच्या राज्य संचालक उषा वर्मा, विभागीय उपायुक्त अर्जुन मोहोळ, जिल्हा अधिक्षक युवराज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक डी.एम. चकोर, दुय्यम निरीक्षक डी.जे. मेहता, एस. एस. रावते, हंसराज चौधरी, हेमंत डी. पाटील, हितेश जेठे, अविनाश पाटील, अजय रायते यांच्या पथकाने हि कारवाई केली. पुढील तपास निरीक्षक डी.एम. चकोर करीत आहेत.
 
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नंदुरबार कार्यालयात कमी मनुष्यबळ असताना अधीक्षक युवराज राठोड यांनी शर्तीचे प्रयत्न करीत डिसेंबर महिन्यात सलग दुसऱ्यांदा धडाकेबाज कारवाई केल्याबद्दल पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे