मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे बीसीसीआयने विजय मर्चंट अंडर 16 स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा डेहराडूनमध्ये ९ जानेवारीपासून सुरू होणार होती. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. गेल्या वर्षीही कोरोनामुळे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली नव्हती. दरम्यान बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी यापूर्वी बोर्ड स्पर्धा पुढे ढकलू शकतं असे संकेत दिले होते.
गेल्या काही आठवड्यांमध्ये देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. BCCI ने यापूर्वी 2021-2022 अंडर 16 टूर्नामेंटमध्येही अधिक व्ययाच्या खेळूंनाही खेळण्याची परवानगी दिली होती. बीसीसीआयने यामागे कोरोनामुळे खेळाडू उपलब्ध नसल्याचे कारण दिले होते. बोर्डाने 16 वर्षांवरील सुमारे 60 खेळाडूंची निवड करण्यात आली होती. 4 महिने उशीर झाला असल्याने अधिक वयाच्या खेळाडूंनाही क्रीडा संघटनांनी या स्पर्धेत खेळवण्याची विनंती केली होती. ही मागणी बोर्डाने मान्य केली होती. दरम्यान भारतात ओमिक्रॉनच्या प्रकरणांनी देशात 1000चा टप्पा ओलांडला आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये या व्हेरिएंटचे सर्वाधिक रूग्ण आहेत.