राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ फेब्रुवारीला नागपुरात

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

    दिनांक : 27-Dec-2021
Total Views |
मुंबई : राज्याचं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात होणार असून, २८ फेब्रुवारी रोजी हे अधिवेशन सुरू होणार आहेत. याबाबतची घोषणा आज राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे.
 
nagpur-adhiveshan_1
 
पुढील अधिवेशन हे नागपुरात घेण्यात यावं अशी मागणी सातत्याने समोर येत होती. यंदाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूर ऐवजी मुंबईत होत असल्याने ही मागणी अधिकच जोर धरत होती. विधीमंडळ कामकाज समितीची पहिली बैठक ही आज पार पडली. या बैठकीत आगामी अधिवेशनाबाबत चर्चा झाली.