शिरपूर : अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या माध्यमातून समाजासह तरुण, महिला आणि राष्ट्रहितासाठी केले जात असलेले कार्य उल्लेखनीय असून गौरवास्पद आहे, अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी ब्राम्हण महासंघाच्या कार्याचे कौतुक केले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या २०२२ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी अमृता फड़णवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, ब्राह्मण महासंघाची दिनदर्शिका अतिशय सुंदर असून लोकोपयोगी अशी आहे. ब्राह्मण समाजासह समस्त समाजासाठी, युवा पिढ़ी आणि महिलांसाठी तसेच राष्ट्रहिताच्या दृष्टीने महासंघाने केलेले कार्य उल्लेखनीय आहे. असेच काम यापुढे जोमाने करावे ,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महासंघाचे कार्य अधिक जोमाने होण्यासाठी अमृता फडणवीस यांच्या हस्ते शिरपूरचे ऍड. सुहास वैद्य यांची खान्देश विभागीय अध्यक्षपदी तर शुभांगी जोशी यांची विभागीय मुंबई अध्यक्षपदी तसेच किशोर देशपांडे यांनी नाशिक जिल्हा संपर्क व संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. ऍड.सुहास वैद्य हे शिरपूर ब्राम्हण सभेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांनी समाज संघटीत करुन समाजाच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम व कार्यक्रम यांच्या माध्यमातून सतत प्रयत्नशील असतात. कोरोना योद्धा म्हणून ही त्याना सन्मानित करण्यात आले आहे.
मुंबईत झालेल्या या प्रकाशन सोहल्यात भारतमातेचा व भगवान श्री परशुराम यांचा जयजयकार करून भारतमातेची प्रतिमा, तसेच समर्थ रामदास स्वामी यांनी स्वहस्ते स्थापन केलेले आगरटाकळी येथील गोमय मारुती मंदिराची माहिती पुस्तिका भेट देण्यात आली. यावेळी एका वृत्तपत्राचे विमोचनही करण्यात आले. या शिष्टमंडळात प्रदेशअध्यक्ष सुरेश मुळे, सतीश शुक्ल, ऍड.भानुदास शौचे, ऍड. सुहास वैद्य, सखाराम कुलकर्णी, आर.आर.कुलकर्णी, शुभांगी जोशी, किशोर देशपांडे यांच्यासह अनेक पदाधिकार्यांची उपस्थिती होती. ऍड. सुहास वैद्य यांच्या नियुक्तीचे अजय धर्माधिकारी, अविनाश शुक्ल, मयूर वैद्य व परिवार,सुनील ढवळे यांच्यासह शिरपूर ब्राम्हण सभेच्या पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यानी व मित्र परिवाराने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.