मुंबई : शुक्रवारी, शेअर बाजाराची दमदार सुरुवात झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 300 अंकांनी वधारत 57,251 अंकावर सुरू झाला. तर, निफ्टीने देखील बाजार सुरू होताच 17,000 निर्देशांक टप्पा ओलांडला. या आठवड्याच्या सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. त्यानंतर बाजार सावरू लागला आहे.
शेअर बाजारात बँकिंग, ऑटो, फार्मा, मेटल्स, एनर्जी आणि एफएमसीजी क्षेत्रात चांगली सुरुवात झाली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअरमधील स्टॉकचे शेअर दर चांगले वधारले आहेत. बँक निफ्टीमध्ये चांगली तेजी आहे., बंधन बँक, आरबीएल बँक, इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे.
कोणते शेअर्स वधारले
आज बाजारामध्ये बिर्ला सॉफ्ट, फायजर, L&T Finance, Adani Ports, Jubiliant Food, IOC, DLF, LIC Housing Finance, ONGC आदी शेअर दरात वाढ झाली आहे. इंडिगो, सेल पॉवर फायनान्स आणि पॉवर ग्रिडच्या शेअर दरात चांगली सुरुवात झाली आहे.
पहा कोणत्या शेअर्सचे दर घसरले
जे.के. सिमेंट, डिव्हीस लॅब, भारती एअरटेल, एचडीएफसी एएमसी, एशियन पेंट्स, मॅरिको आदी शेअर दरात घसरण झाली आहेस.
बुधवारी सेन्सेंक्स 611.55 अंकांनी म्हणजेच 1.09 टक्क्यांनी वधारत शेअर बाजार 56,930.56 निर्देशांकावर बंद झाला होता. तर, निफ्टी इंडेक्स 184.60 अंकांनी म्हणजेच 1.10 अंकानी वधारला होता. त्याशिवाय बँक निफ्टीतही 421 अंकानी वधारला होता.