सोयगाव नगरपंचायतीची वर्षभरात तिसर्‍यांदा आरक्षण सोडत जाहीर

    दिनांक : 24-Dec-2021
Total Views |
सोयगाव : एकाच नगरपंचायतीचे वर्षभरात तिसर्‍यांदा आरक्षण व सोडत जाहीर होत असल्याने राजकीय इतिहासात पहिल्यांदाच नोंद झाली आहे. उपविभागीय अधिकारी संजीव मोरे, तहसीलदार रमेश जसवंत, मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी, कार्यालयीन अधीक्षक ईश्वर शिमरे, किशोर मोरे, राजू जंजाळ आदींच्या उपस्थितीत सोयगाव नगरपंचायतच्या उर्वरित सर्वसाधारण झालेल्या चार जागांची सोडत गुरुवार, २३ रोजी तहसील कार्यालयात श्रेया रावणे व पलक गायकवाड या मुलींच्या हस्ते चिठ्ठी काढून जाहीर करण्यात आली.
 
soyagaon_1
 
त्यामुळे सोयगाव नगरपंचायत निवडणुकीचे पुन्हा वारे वाहू लागले आहे. सोयगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी वर्षभरात तिसर्‍यांदा आरक्षण व सोडत जाहीर झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेनंतर न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी राखीव झालेल्या चार प्रभागांच्या निवडणुकीला स्थगिती आल्याने १७ पैकी १३ जागांसाठी मंगळवार, २१ रोजी मतदान प्रकिया पार पडली. ओबीसी असलेल्या उर्वरित चारजागा सर्वसाधारण झाल्याने चार जागांची तिसर्‍यांदा २३ रोजी तहसील कार्यालयात श्रेया रावणे व पलक गायकवाड या लहान मुलींच्या हस्ते सोडत काढण्यात आली. यात प्रभाग १ सर्वसाधारण महिला, प्रभाग २ सर्वसाधारण पुरुष, प्रभाग १४ सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक १६ सर्वसाधारण पुरुष. दोन महिला, दोन पुरुष अशा चारही जागा सर्वसाधारण होऊन सोडत निघाल्याने नगरपंचायत निवडणुकीचे वातावरण तापणार आहे. नुकत्याच झालेल्या १३ जागांच्या निवडणुकीचा अंदाज बांधत राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे.