शेअर बाजार मध्ये काळा सोमवार सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला

    दिनांक : 20-Dec-2021
Total Views |
Sensex Crash : शेअर बाजारातील गुंतवणुकदारांसाठी आज दिवस काळा सोमवार ठरला. शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. बाजार सुरू होताच सेन्सेक्समध्ये 940 हून अधिक अंकांची घसरण झाली. तर निफ्टीदेखील एक टक्क्यांनी घसरला. कोरोनाबाधितांची वाढत असलेली संख्या, ओमायक्रॉनचे सावट आणि देशांनी लावलेले निर्बंध याचा बाजारावर परिणाम दिसून आला. आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातही मंदीचे सावट दिसून आले.
 
share_1  H x W: 
 
शेअर बाजारच्या प्री-ओपन सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स 500 अंकाहून अधिक अंकाने घसरून 56,500 अंकांवर स्थिर राहिला. बाजार सुरू होताच, सेन्सेक्समध्ये 675 अंकापेक्षा अधिक घसरण झाली. तर, निफ्टीमध्येही 218.10 अंकांनी घसरून 16765 अंकावर आला. काही वेळेनंतर निफ्टीमध्ये आणखी घसरण झाली.
 
बाजार सुरू होताच सुरू झालेली घसरण काही वेळेनंतर सावरेल असा अंदाज होता. मात्र, सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 1035.86 अंक म्हणजे 1.82 टक्क्यांनी घसरला. एनएसई निफ्टी 32 अंकांनी 1.90 टक्क्यांनी घसरला आणि 16,662.20 अंकांवर व्यवहार करत होता.
 
सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 1285.74 अंकानी घसरून 55,737 अंकावर आला होता. तर, निफ्टीमध्ये 382.65 टक्क्यांची घसरण झाली आणि 16,604 अंकावर व्यवहार करत होता.
शेअर बाजारात मागील आठवड्यात मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्समध्ये 1774.936 अंक म्हणजे 3 टक्क्यांनी घसरण झाली. तर, निफ्टी 50 मध्येही 526.1 अंकांनी घसरण झाली होती.
 
मागील दोन आठवड्यांच्या तेजीनंतर मागील आठवड्यात घसरण झाली. कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनबाधितांची वाढती प्रकरणे, एफपीआयकडून होणारी सातत्याने विक्री आणि उच्च पातळीवर सुरू असणारी नफा वसुली आदी कारणांमुळे शेअर बाजारात घसरण झाल्याचे दिसत आहे.