नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना महामारी काळात कर्तव्य बजावतांना जीव गमावनारे तीन पोलिस कर्मचार्यांना मॅनकाईड कंपनीतर्फे प्रत्येकी ३ लाख रुपयेप्रमाणे एकूण ९ लाख रुपयांची मदत देण्यात आला. पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.
मॅनकाईड कंपनीतर्फे पो.कॉन्स्टेबल कै.दीपक हरिश्चंद्र पगारे, कैलास मधुकर चव्हाण ,शशिकांत एस नाईक यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ३ लाख रुपयांचा धनादेश मदतीचा धनादेश पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. कोरोनाकाळात कर्तव्य चोखपणे बजावत असताना जीव गमवावा लागलेल्या डॉक्टर्स, केमिस्ट व पोलीस दल कर्मचारी यांचा कुटूंबीयांना मॅनकाईड कंपनीतर्फे ३ लाख रुपयाची मदत केली गेली आहे. त्याच्यात नंदुरबार जिल्हातील सर्व पोलीस कर्मचारी यांचा कुटुंबियांना नंदुरबार मॅनकाईड कंपनीचे सर्व कर्मचारी यांचा उपस्थितीत पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस उपाधिक्षक विश्वास वळवी यांच्या हस्ते ३ लाख रुपयांचा धनादेश त्यांच्या कुटूंबियांना सुपूर्द केला. त्यावेळी मॅनकाईड फार्मा कंपनीचे वीरेंद्र पाटील, ज्ञानेश्वर पाटील, मुकेश चौधरी, समाधान पाटील, गणेश मराठे, योगेश पाटील उपस्थित होते.
मॅनकाईड कंपनीने सामाजिक बांधिलकी जोपासत आपल्या जीवाची पर्वा न करणार्या कोरोनाकाळात जीव गमविलेल्या परिवारासाठी देशभरात १०० कोटींच्यावर मदत केलेली आहे. नंदुरबार कोरोनाकाळात कर्तव्य बजावत असताना आपला जीव गमविणारे तीन पोलिस कर्मचार्यांच्या नातेवाईकांना मॅनकाईड कंपनीमार्फत प्रत्येकी ३ लाख रुपयांच्या धनादेश पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस उपाधीक्षक गृह विश्वास वळवी, वीरेंद्र पाटील, ज्ञानेश्वर पाटील, मुकेश चौधरी, समाधान पाटील, गणेश मराठे, योगेश पाटील उपस्थित होते.