कोविडमुळे मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन

    दिनांक : 18-Dec-2021
Total Views |
धुळे : ‘कोविड-१९’ या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटच्या नातेवाईकांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने विकसित केलेल्या पोर्टलवर ‘कोविड१९’ मुळे मृत पावलेल्या व्यक्तींचे नातेवाईक, वारसांनी तातडीने ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

corona_1  H x W 
 
‘कोविड-१९’ मुळे मृत व्यक्तीचे निकटचे नातेवाईक, अर्जदारांनी mahacovid19relief.in या संकेतस्थळावर लॉगइन करणे आवश्यक आहे. त्यासाठी https://epassmsdma.mahait.org/login.htm यावर लिंक देण्यात आली आहे. मृत व्यक्तीचे निकटचे नातेवाईक, अर्जदारास त्याचा आधार क्रमांक, मृत व्यक्तीचे आधार कार्ड (पीडीएफ, जेपीजी), मृत्यू प्रमाणपत्र (पीडीएफ, जेपीजी), मृत व्यक्तीचे निकटचे नातेवाईक, अर्जदाराचा आधार संलग्न बँक खाते क्रमांक, अर्जदाराने खाते क्रमांक दिलेल्या बँक खात्याचा रद्द केलेला धनादेश (पीडीएफ, जेपीजी) आणि रुग्णालयाचा तपशील, आरटीपीसीआर रिपोर्ट, सीटी स्कॅन रिपोर्ट किंवा ज्यावरुन त्या व्यक्तीस ‘कोविड१९’ चे निदान झाले, अशी कागदपत्रे (पीडीएफ, जेपीजी) तसेच कुटुंबातील सर्व वारसांचे हमीपत्र व स्वयंघोषणापत्र अपलोड करावे, असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले.