मुंबई : अमेरिकेत मागील 40 वर्षातील सर्वाधिक महागाई नोंदवण्यात आल्यानंतरही अमेरिकन शेअर बाजार वधारला असल्याचे दिसून आले. त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. आशियाई शेअर बाजार आज तेजीत असल्याचे दिसून आले. चांगले संकेत दिसत असल्याने शेअर बाजार वधारत सुरू झाला. सेन्सेक्सची सुरुवात आज दमदार झाली. बाजार सुरू झाल्यानंतर काही वेळेतच सेन्सेक्स 360 अंकांनी वधारला होता. सेन्सेक्सने 59 हजारांना आकडा ओलांडला. त्याशिवाय निफ्टी वधारला असल्याचे दिसून आले. निफ्टीत 17,580 च्या आसपास ट्रे़ड करत आहे. निफ्टीने जवळपास 100 अंकांने उसळण घेतली होती.
आज शेअर बाजार SGX Nifty मध्ये 100 अंकानी वधारला. सेन्सेक्सही 0.54 टक्के म्हणजे जवळपास 317 अंकानी वधारला होता. तर, निफ्टीदेखील 107 अंकांनी वधारला होता. आज बाजार सुरू झाला तेव्हा निफ्टी 50 मधील 49 कंपन्यांच्या शेअरचे दर वधारले होते. फक्त बजाज फायनान्सच्या शेअरमध्ये एक टक्क्यांच्या आसपास घसरण दिसून आली. निफ्टीमध्ये पॉवर ग्रिड 2.54 टक्के, अॅक्सिस बँक दोन टक्के, हिंदाल्को 1.96 टक्के आणि युपीएल 1.90 टक्क्यांनी वधारला होता. जेएसडब्लू स्टीलचा शेअर दर 1.75 टक्क्यांनी वधारला होता.