मुंबई : प्रसिद्ध अभिनेता सनी देओलचा 2001 मध्ये प्रदर्शित झालेला ‘गदर’ हा चित्रपट लोक आजही आवडीने पाहतात. या चित्रपटात सनी देओलसोबत अभिनेत्री अमिषा पटेलने प्रमुख भूमिका साकारली होती. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
‘गदर-2’च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून, अमिषा पटेलने या चित्रीकरणाची छायाचित्रे समाजमाध्यमावर सामायिक केली आहेत. यात सनीच्या लूकला नेटकर्यांची पसंती मिळत आहे. या चित्रपटात सकिना ही भूमिका अमिषा पटेल तर तारा सिंग ही भूमिका सनी देओल साकारणार आहेत. गदर-2 चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी केले आहे. गदर हा चित्रपट 19 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आला होता.