तर सलमानची सर्व संपत्ती जाणार ट्रस्टला!

    दिनांक : 03-Nov-2021
Total Views |
 

salaman_1  H x  
 
मुंबई : अभिनेता सलमान खान लग्न कधी करणार, हा प्रश्न आता सर्वांच्याच दृष्टीने नित्याचा झाला आहे. त्याविषयी फार कोणी बोलू इच्छित नाही, पण आता सलमानने आपल्या संपत्तीविषयीचा निर्णय जाहीर केला आहे. त्याने सांगितले की, मी लग्न केले तर माझी अर्धी संपत्ती माझ्या कुटुंबाला मिळेल. तथापि, मी लग्न केलेच नाही तर माझी संपूर्ण संपत्ती सामाजिक संस्थेच्या ट्रस्टलाच दिली जाईल. सलमानची स्वत:ची ‘बीईंग ह्यूमन’नावाची सामाजिक संस्था आहे. याद्वारे बरेच सामाजिक उपक‘म राबविले जात असतात.