मराठी साहित्य संमेलनात चार दिवस भरगच्च कार्यक्रम

ग्रथदिंडी, पुस्तक प्रदर्शन, कविकट्टा, कथाकथन

    दिनांक : 25-Nov-2021
Total Views |
नाशिक : यंदाचे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या 3 ते 4 डिसेंबर या कालावधीत नाशकातील भुजबळ नॉलेज सिटी परिसरात होत असून, यानिमित्ताने ग्रथदिंडी, पुस्तक प्रदर्शन, कविकट्टा, परिसंवाद, मुलाखत, कथाकथन, बालसाहित्य मेळावा अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर संमेलनाचे अध्यक्ष, तर पालकमंत्री छगन भुजबळ स्वागताध्यक्ष आहेत.
 

sahitya_1  H x  
 
 
संमेलनाचे मुख्य कार्यक्रम तीन दिवसांचे असले तरी, ग्रंथदिंडीच्या पूर्वसंध्येला 2 डिसेंबरला सायंकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत डॉ. सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा ‘माझे जीविची आवडी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होत आहे. विनोद राठोड हे समन्वयक असतील. पहिल्या दिवशी 3 डिसेंबरला सकाळी 8.30 वाजता कविवर्य कुसुमाग्रज प्रतिष्ठान, टिळवाडी, निमाणी बसस्थानक, कविवर्य कुसुमाग्रजनगरी, एमईटी कॅम्पस, भुजबळ नॉलेज सिटी या मार्गे ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आणि पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल. सकाळी 11.20 वा. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. यावेळी विशेष अतिथी म्हणून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांच्यासह महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित असतील. सकाळी 11.30 वा. प्रा. गो. तु. पाटील येवला हे नाशिक लेख पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांची उपस्थिती असेल. 11.45 वा. विश्वनाथ साबळे, अच्युत पालव, प्रभाकर कोलते यांच्या हस्ते कला प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. विशेष अतिथी म्हणून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे उपस्थित असतील.
याच दिवशी सायंकाळी 4.30 वाजता संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांच्या हस्ते 94 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होईल. सायंकाळी 7.30 वा. मराठी साहित्य महामंडळाचे पदाधिकारी आणि संमेलनाध्यक्ष हे कविकट्ट्याचे उद्घाटन करतील. मुख्य अतिथी म्हणून न्या. जं. पा. झपाटे, प्रमुख पाहुणे म्हणून रामदास फु टाणे उपस्थित असतील. आयपीएस दत्ता कराळे, आयपीएस बी. जी. शेखर पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल.रात्री 8 ते 12 वाजेपर्यंत श्रीधर नांदेकर यांच्या अध्यक्षतेत निमंत्रित कवींचे काव्य संमेलन पार पडेल.