मुंबई : लोकप्रिय आणि तुफान कॉमेडशी शो असलेल्या द कपिल शर्मा शोला प्रेक्षकांची चांगलीच पसंती असते.अशाच एका युवकाने एका ट्विटच्या माध्यमातून आपली इच्छा व्यक्त केली अन् त्याचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे दिसून येत आहे. कॉमेडियन कपिल शर्माने मनिष कुमार यांचा मुंबईतील फोटो पाहून त्यांचा ट्विटरवरील मेसेज वाचला आणि त्यांना थेट आपल्या शोमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण दिलं आहे. मनिष कुमार यांनी आपल्या चिमुकल्या मुलीसोबतचा एक फोटो ट्विटरवरुन शेअर केला आहे. त्यामध्ये, मुंबईतील समुद्रकिनाीर मरीन लाईनवर ते आपल्या लेकीसह पर्यटनाचा आनंद घेताना दिसत आहेत. विशेष म्हणजे गेल्या 23 नोव्हेंबर रोजी मुंबईतून गावी निघणार आहोत. तत्पूर्वी, माझ्या लेकीला आपला शो लाईव्ह पाहायची खूप इच्छा आहे.
माझ्या मुलीची ही पहिलीच मुंबईत ट्रीप असून तिला तुमचा शो खूप आवडतो, असे ट्विट मनिष कुमारने केलं आहे. तसेच, माझ्या मुलीला आणि कुटुंबास आपल्या शोमध्ये सहभागी होण्याची संधी द्यावी, अशी मागणीही मनिष यांनी केली आहे. मनिष यांच्या ट्वटिला कपिलने तात्काळ उत्तर देत थेट शोमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रणच दिले आहे. भावा, आम्ही उद्याच शूटींग करत आहोत, आपण आपला कॉन्टॅक्ट नंबर द्यावा, माझी टीम आपल्याशी संपर्क साधून शोमध्ये सहभागी करून घेईल, असे उत्तर कपिलने मनिष यांना दिले आहे. त्यामुळे, कपिलच्या पुढील काही दिवसांत होणाऱ्या शोमध्ये मनिष कुमार दिसणार का, मनिष कुमार यांची कन्या असेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.