धोनी अन् शास्त्रींमध्ये 'वादा'चे फटाके?...दृश्ये कॅमेरात कैद

    दिनांक : 02-Nov-2021
Total Views |
नवी दिल्ली : आयसीसी टी२० विश्वचषकात भारतीय संघाला लौकिसास साजेशे प्रदर्शन करण्यात अपयश येते आहे. विराट कोहलीसारखा कर्णधार आणि रोहित शर्मासारखा उपकर्णधार असणाऱ्या या संघातील खेळाडू विरोधकांपुढे अक्षरश: गुडघे टेकताना दिसत आहेत. इतकेच नव्हे तर रवी शास्त्रींसारखा मुख्य प्रशिक्षक आणि एमएस धोनीसारखा मार्गदर्शक लाभूनही संघाला सलग २ सामन्यात पराभवास सामोरे जावे लागले आहे. या सामन्यादरम्यान असे काही दृश्य पाहायला मिळाले, जे बघून शास्त्री, धोनी आणि कर्णधार कोहली यांच्यात सर्वकाही अलबेल नसल्याचे दिसते आहे. सामन्यातील हे फोटो व्हायरल झाल्यानंतर धोनी, शास्त्री आणि कर्णधार कोहली यांच्यामध्ये काही निर्णयांबद्दल असहमती असल्याची चर्चा होते आहे. यावरुनच आता धोनी आणि शास्त्रींमध्ये वादांचे फटाके फुटल्याची चर्चा सुरू झाली आहे.
 

dhoni_1  H x W: 
 
काय आहे फोटोमध्ये?
 
उपांत्य फेरीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी फळी अशाप्रकारे कोलमडल्याचे पाहून मार्गदर्शक धोनीचा पारा चढला. यामुळे सामन्या दरम्यान तो संघ प्रशिक्षक शास्त्रींना त्यांच्या निर्णयांबद्दल जणू जाब विचारत असल्यासारखी दृश्ये कॅमेरात कैद झाली आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसते की, धोनी खूप चिडलेला दिसत आहे. तर शास्त्री आपल्या निर्णयांबद्दल त्याला स्पष्टीकरण देताना दिसत आहेत.