पाकिस्तानच्या पराभवावर पंतप्रधान इम्रान खान यांचे वक्तव्य

    दिनांक : 12-Nov-2021
Total Views |
इस्लामाबाद : टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारण्यात पाकिस्तानचा संघ अपयशी ठरला आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा रोमहर्षक सामन्यात पराभव केला. उपांत्य फेरीतील पराभवानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे वक्तव्यही समोर आले आहे.
 
imran_1  H x W:
 
 
बाबर आझम आणि त्यांच्या संघाला कसे वाटले असेल हे मला माहित आहे. परंतु त्यांना त्यांच्या खेळाचा अभिमान असला पाहिजे. बाबर आझम आणि त्याच्या टीमला, तुम्ही सर्वजण सध्या कसे अनुभवत आहात, मी देखील क्रिकेटच्या मैदानावर अशा निराशेचा सामना केला आहे. पण तुम्ही ज्या प्रकारचे क्रिकेट खेळलात आणि तुमच्या विजयात दाखवलेली नम्रता याचा तुम्हाला अभिमान असायला हवा. ऑस्ट्रेलिया संघाचे अभिनंदन, असे इम्रान खान यांनी सांगितले आहे.
पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत पोहोचला तर तो अंतिम सामना पाहण्यासाठी यूएईला जाऊ शकतो. पण तसे झाले नाही आणि सेमीफायनलमध्येच ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानच्या पराभवानंतर लगेचच इम्रान खानची माजी पत्नी रेहम खानचे ट्विटही समोर आले, ज्यामध्ये तिने इम्रानला टोला लगावला. रेहम खानने ट्विटमध्ये लिहिले की, 'खान साहेबांनीही तुम्हाला फायनल पाहण्याचा आग्रह करू नका असे सांगितले होते, असे सेमीफायनल सामन्यापूर्वी इम्रानने सांगितले होते.