अंपायरच्या निर्णयावर रिकी पाँटिंग भडकला

    दिनांक : 05-Oct-2021
Total Views |
दुबई : दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यांमध्ये खराब फलंदाजीवरून चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर टीका करण्यात आली. या सोबतच शेवटच्या ओव्हरमध्ये अंपायरने दिलेल्या निर्णयावर दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग भडकला. तसेच थेट अंपायरला जाब विचारण्यासाठी पोहोचला, या कृत्याचीच सर्वत्र चर्चा आहे.
 

riki_1  H x W:  
चेन्नईने सुपर किंग्ज कडून मिळालेले आव्हान पूर्ण करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स सामन्यासाठी सज्ज झाले. सामन्यादरम्यान ड्वेन ब्रावोच्या पहिल्याच बॉलवर शिमरॉन हेयमायरने 2 रन्स काढले. ब्रावोचा दुसरा चेंडू त्याच्या हातून निसटला आणि चेंडू खेळपट्टीच्या लांबून येत थेट विकेटमागे जाऊन पडला. यावर अंपायर त्या बॉलला नो बॉल देणार, असे वाटत असताना त्यांनी तो वाईड बॉल करार केला. अंपायरचा हा निर्णय रिकी पॉटिंगला पटला नाही. या निर्णयावर संतापतो थेट बाऊंड्री लाईनच्या जवळ असलेल्या अंपायरकडे गेला. त्याने त्या अंपायरकडे तो नो बॉल देण्याची मागणी केल्यानंतरही अंपायरकडून त्या निर्णयात बदल करण्यात आला नाही.