एमएस धोनीचा आयपीएलमध्ये नवा विक्रम

    दिनांक : 03-Oct-2021
Total Views |
दुबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्या चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने आयपीएल 2021 मध्ये एक नवा विक्रम बनविला आहे. या आयपीएल 2021 लीगमध्ये 200 सामन्यांमध्ये कर्णधार पद भूषविणारा एमएस धोनी पहिला खेळाडू बनला आहे. यासोबतच कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रमही फक्त धोनीच्या नावावर आहे.
dhoni_1  H x W: 
 
आयपीएल लीगमध्ये सर्वाधिक सामन्यांचे नेतृत्व करणारा कर्णधार हा एमएस धोनी आहे. सोबतच कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रमही धोनीच्याच नावावर आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसके आयपीएल 2021 च्या पहिल्या चारमध्ये स्थान मिळवणारा पहिला संघ बनला आहे. माहीने आयपीएलमध्ये 200 सामन्यांमध्ये कर्णधारपद मिळवून नवा इतिहास रचला आणि असे करणारा तो पहिला कर्णधारही आहे.
या लीगमध्ये धोनीनंतर सर्वाधिक सामन्यांचे नेतृत्व करणारा कर्णधार विराट कोहली आहे. कोहलीने आतापर्यंत 136 सामन्यांमध्ये कर्णधारपद गाजवले आहे. यासोबतच गौतम गंभीर हा तिसऱ्या क्रमांकावर असून, त्याने 129 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे . रोहित शर्मा या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर असून, त्याने एकूण 127 सामन्यांमध्ये कर्णधारपद सांभाळले आहे. पाचव्या स्थानावर कर्णधार अॅडम गिलख्रिस्ट 74 सामन्यांसह आहे.