पीव्ही सिंधूचे आव्हान संपुष्टात

    दिनांक : 24-Oct-2021
Total Views |


pv_1  H x W: 0
 
 
 ऑलिम्पिक पदकानंतरचे पी. व्ही. सिंधूचे पुनरागमन डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मर्यादित राहिले. महिला एकेरीत जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावरील कोरियाच्या ऍन सेयंगने सरळ गेममध्ये सिंधूचा पराभव केला. ऑगस्टमध्ये टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या सिंधूला पहिल्याच स्पर्धेत पाचव्या मानांकित ऍन सेयंगपुढे निभाव लागला नाही. फक्त 36 मिनिटांत सिंधूने 11-21, 12-21 अशा फरकाने गाशा गुंडाळला. दोन वर्षांपूर्वी या दोन खेळाडूंमध्ये झालेल्या एकमेव लढतीतसुद्धा सिंधूने सेयंगकडून पराभव पत्करला होता. दरम्यान, सिंधून उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफामनवर विजय मिळवला होता. तीन गेमपर्यंत रंगलेल्या या सामन्यात सिंधूने बुसाननचा 67 मिनिटांत 21-16, 12-21, 21-15 असा पराभव केला होता.