विराट कोहलीला कर्णधारपद सोडल्याचा होणार फायदा

    दिनांक : 23-Oct-2021
Total Views |
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहलीने टीम इंडियाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. आता भारतीय क्रिकेट संघाचा नवीन कर्णधार कोण असणार, हा प्रश्न सर्वांसमोर आहे. मात्र कॅप्टन्सी सोडल्याचा फायदा कोहलीलाच होणार आहे, अशी माहिती एका माजी क्रिकेटपटूने सांगितली आहे.

virat_1  H x W:
 
 
विराट कोहलीने टी-20 फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडल्यानंतर टीम इंडियाला फायदा होऊ शकतो. पण कॅप्टन्सी सोडल्याच्या निर्णयाने कोहलीवर दबाव कमी होईल. जेव्हा तुम्ही कर्णधार बनता, तेव्हा तुम्ही फक्त स्वतःचा विचार करू शकत नाही. त्याला एका फलंदाजाशी बोलावे लागते, जो वाईट टप्प्यातून जात असतो किंवा गोलंदाजाशी रणनीतींवर चर्चा करतो. या सगळ्यात गरजेनुसार स्वतःच्या खेळाकडे लक्ष देता येत नाही. जेव्हा तुमच्यावर कोणतेही दडपण नसते, तेव्हा तुम्ही तुमच्या खेळावर लक्ष केंद्रित करू शकता, असा विश्वास 'लिटल मास्टर' सुनील गावस्कर यांनी व्यक्त केला आहे.
विराट कोहलीने आपल्या कर्णधारपदाखाली टीम इंडियासाठी एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही, त्यामुळे या स्पर्धेद्वारे तो हे वाक्य खोडून काढणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. टी20 वर्ल्डकपनंतर सर्वात कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहलीवर वरून कमी दबाव असेल. त्याला गेल्या 2 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेलें नाही, त्यामुळे आता तो शतक झळकावण्याचा पूर्ण प्रयत्न करू शकणार आहे.