द्रविडला मिळणार शास्त्रींपेक्षा अधिक मानधन

    दिनांक : 18-Oct-2021
Total Views |
नवी दिल्ली :  टी-20 विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारणार्‍या राहुल द्रविड यांना विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यापेक्षा अधिक मानधन मिळणार आहे. शास्त्री यांचे वार्षिक मानधन 10 कोटी रुपये आहे. बीसीसीआय द्रविडला वर्षाला दहा कोटी रुपये मानधन देणार आहे. याशिवाय त्याला कामगिरीचा बोनसही दिला जाणार आहे. अर्थात द्रविडला दहा कोटींपेक्षा अधिक मानधन मिळणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
 
 

dravid_1  H x W
 
 
यापूर्वी, बीसीसीआयने 2003 दरम्यान भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक जॉन राईट यांना वर्षाला एक कोटी रुपये मानधन दिले. ग्रेग चॅपल यांचे वार्षिक मानधन 1.25 कोटी रुपये होते. बीसीसीआयने चॅपेलनंतर गॅरी कर्स्टन यांना वार्षिक मानधन 2.5 कोटी रुपये दिले होते. यानंतर, प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांची 4.5 कोटी रूपयांच्या वार्षिक मानधनावर नियुक्ती केली. अनिल कुंबळेंचा कार्यकाळ अत्यंत अल्प होता, परंतु बीसीसीआयने कुंबळेंना एका वर्षात 6.25 कोटी रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला होता. कुंबळेनंतर रवी शास्त्री यांचे वार्षिक मानधन 10 कोटी रुपये होते.