मुंबई : दिव्या दत्ताने लिहिलेले दुसरे पुस्तक लवकरच प्रसिद्ध होणार आहे. 'द स्टार्स इन माय स्काय- दोज हू ब्राईटंन्ड माय फिल्म जर्नी' असे या पुस्तकाचे नाव असणार आहे. फिल्मी दुनियेतील काही प्रमुख कलाकारांबरोबरच्या कामाच्यावेळी आलेल्या अनेक अनुभवांना या पुस्तकात एकत्र केले गेलेले असणार आहे. ज्यांचे काम बघत बघत आपण मोठी झाले, जेव्हा अडचणीची वेळ आली तेव्हा या मोठ्या कलाकारांनी मदतीचा होत पुढे केला आणि ज्यांनी शाबासकीची थापही दिली, असा कलाकारांबद्दल दिव्याने या पुस्तकात आले मनोगत लिहिले आहे.
'वीर-झारा', 'दिल्ली-6′ आणि 'भाग मिल्खा भाग' यासारख्या सिनेमांच्यावेळचे अनुभव तिने या पुस्तकात लिहिले आहेत. अमिताभ बच्चन, देव आनंद, दिलीप कुमार, शबाना आझमी, नसिरुद्दीन शाह आणि यश चोप्रा या सर्व कलाकारांना धन्यवाद देण्यासाठी त्यांच्याबद्दलच्या अनुभवांना या पुस्तकात उतरवले गेले असल्याचे तिने सांगितले. अमिताभ बच्चन यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. दिव्या दत्ताचे पहिले पुस्तक 'मी ऍन्ड मा' 2017 साली प्रसिद्ध झाले होते. आपल्या आईबद्दलच्या भावना तिने या पुस्तकात शब्दबद्ध केल्या होत्या.