टीम इंडियाच्या फलंदाजाचे दुःखद निधन

    दिनांक : 16-Oct-2021
Total Views |
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या हवाल्याकडून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सौराष्ट्रचा फलंदाज अवि बारोट हृदयविकाराच्या झटक्याने याचे वयाच्या 29व्या वर्षी निधन झाले आहे. सौराष्ट्र व्यतिरिक्त अवी बरोट हरियाणा आणि गुजरातसाठी देखील तो क्रिकेट खेळला होता. तसेच तो टीम इंडियाच्या अंडर -19 संघा सोबतच, रणजी क्रिकेट चॅम्पियन संघाचाही भाग होता. अविच्या जाण्याने दुःख झाले असल्याचे सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने जारी करण्यात आले आहे.
cricket_1  H x
 
 
सौराष्ट्रचा फलंदाज अवि बरोटचे 15 ऑक्टोबर 2021 रोजी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्यामुळे, निधन झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. अवि बरोट एक उत्तम फलंदाज होता. अवि ऑफ-ब्रेक गोलंदाजी, तसेच यष्टीरक्षण देखील करायचा. अविने एकूण 38 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ज्यात त्याने 1547 धावा बनवल्या होत्या. त्याच वेळी, सुमारे 38 लिस्ट ए सामन्यांमध्ये 1030 धावा केल्या गेल्या. केवळ 20 टी -20 सामन्यांमध्ये 717 धावा केल्या. जेव्हा सौराष्ट्राच्या संघाने रणजी ट्रॉफी जिंकली तेव्हा अवि बरोट त्या विजयी संघाचा भाग होता. अविने सौराष्ट्रसाठी 21 रणजी सामने, 17 लिस्ट ए सामने, 11 टी -20 सामने खेळले आहेत. अवि बरोट यावर्षी मार्चमध्ये शेवटचा सामना खेळला आहे.