नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (IPL)- 2021 चे अजिंक्यपद चेन्नई सुपर किंग्ज (CSK)ने पटकावले आहे. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जने, कोलकाता नाईट रायडर्सचा 27 धावांनी पराभव केला. धोनीचा संघ चौथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावत, यावर्षीचा दसरा अविस्मरणीय आणि सोनेरी केला आहे.
चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना, 20 षटकांत तीन गडी बाद 192 धावा बनवल्या. या धावांचा पाठलाग करत, कोलकाताचा संघ नऊ विकेटवर 165 धावाच करू शकला. फाफ डु प्लेसिस (86 धावा) वगळता गोलंदाजांनी चेन्नईच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
व्यंकटेश अय्यरने लक्ष्याचा पाठलाग करताना 50 धाव केल्या आणि शुभमन गिल (51) यांनी 10.4 षटकांत 91 धावा जोडून शानदार सुरुवात केली. शार्दुल ठाकूरने व्यंकटेश अय्यरला रवींद्र जडेजाच्या हाती झेल देऊन ही भागीदारी तोडली. अय्यरने आपल्या डावात पाच चौकार आणि तीन षटकार मारले. त्यानंतर शार्दुलने त्याच षटकात नितीश राणा (0) ला बाद करत कोलकाताला दुसरा धक्का दिला. यानंतर 12 व्या षटकात जोश हेजलवुडने सुनील नारायणला रवींद्र जडेजाच्या हाती झेल देऊन कोलकाताला तिसरा धक्का दिला. त्यानंतर 14 व्या षटकात शुभमन गिलला दीपक चहरने एलबीडब्ल्यू बाद केले. गिलने आपल्या डावात सहा चौकार लगावले. कोलकाताच्या विकेट्स पडत राहिल्या आणि दिनेश कार्तिक (9) देखील 119 धावांवर रवींद्र जडेजाचा बळी ठरला.
अशा परिस्थितीमध्ये केकेआरकडून मॉर्गनकडून केकेआरचे कर्णधार होण्याची अपेक्षा होती, मात्र पुन्हा एकदा तो अपयशी ठरला आहे. मॉर्गनला (4) जोश हेझलवूडने दीपक चहरच्या हाती झेलबाद केले. शेवटच्या षटकात शिवम मावी (20) आणि लॉकी फर्ग्युसन (नाबाद 18) यांनी केकेआरला मोठ्या पराभवापासून वाचवण्यासाठी काही मोठे फटके खेळले. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक तीन, तर जोश हेजलवूड आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन बळी घेतले.