आजचा मेनू -इंदुरी उपवासाचे चॅट

    दिनांक : 12-Oct-2021
Total Views |
 
induri chat_1  
 
साहित्य
वाटीभर शिंगाडा पीठ, तिखट, मीठ एकत्र करावे. त्यात पाणी घालून शेवेच्या पिठाप्रमाणे भिजवावे. त्यात 2 चमचे गरम तूप घालावे. तूप लावून मळून घ्यावे. तापल्या तुपात मंद गॅसवर सोऱ्याने कढईत शेव पाडून खमंग तळावी. भिजलेला साबुदाणा दीड वाटी, मीठ, साखर, चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर.
 
कृती 
कढईत तूप घालून साबुदाणा टाकावा. मीठ, साखर, हिरव्या मिरचीचे तुकडे घालून मंद गॅसवर परतावे. कोथिंबीर घालावी. प्रथम शिंगाड्याची शेव, त्यावर उकडलेल्या बटाट्याचा कीस, दाण्याचे कूट, चिमूट मीठ, तयार साबुदाणा, बटाटा सली, ओले खोबरे, काजू, बेदाणे, 2 चमचे दही घालावे. वरून कोथिंबीर व चाट मसाला भुरभुरून इंदुरी उपवासाचे चॅट सर्व्ह करावे.