साहित्य :
बटाटे-400 ग्राम
शिंगाड्याचे पीठ-50 ग्राम
काळे मीठ-स्वादानुसार
काळी मिरी पावडर-1 छोटा चमचा
कोथिंबीर
दही-400 ग्राम
तूप-दहीवडे तळण्यासाठी
कृती :
बटाटे उकडून,गार करून सालं काढून घ्या.बटाटे कुस्करून त्यात शिंगाड्याचे पीठ,काळे मीठ,काळी मिरी पावडर,कोथिंबीर घालून चांगले कालवून घ्या.दही चांगले फेटून त्यात काळे मीठ,चिमूट साखर घालून कालवा.कढईत तूप तापत ठेवा.सारण चिकट असल्यामुळे पाण्याने हात ओला करून वड्याचा आकार देऊन वडे कढईत तळायला टाका.सोनेरी होईपर्यंत चांगले तळून घ्या.वडे थोडे गार झाल्यावर दह्यात बुडवा.खायला देताना कोथिंबीर घाला.
टीप :
वरील पाककृती उत्तरेकडची.आपण त्यामध्ये बदल करू शकता,जसे काळ्या मिरीऐवजी हिरवी मिरची वाटून वा काळ्या मिठाऐवजी साधे मीठ वापरावे.