नवी दिल्ली : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसच्या लढ्यात तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरत आहे. नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे या व्हायरसचा संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता पोलंडच्या वैज्ञानिकांच्या टीमने एक खास रिमोट कंट्रोलद्वारे चालणारे व्हेंटिलेटर डिझाईन केले आहे. वैज्ञानिकांना आशा आहे की यामुळे जवळ न जाता याच्या मदतीने गंभीर रुग्णांला व्हेंटिलेटर लावता येईल. यामुळे डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका देखील कमी होईल.
जर प्रायोगिक रेस्पिसेव्ह व्हेंटिलेटर योग्यरित्या काम केल्यास डॉक्टर एका ऍप्लिकेशनच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये कोठेही बसून रुग्णाच्या स्थितीवर लक्ष ठेवू शकतील व मशीनची सेटिंग्स देखील बदलता येईल. डिझायनर्सनी सांगितले की, जर व्हेंटिलेटर निघाले अथवा रुग्णाच्या स्थितीमध्ये वेगाने बदल होत असल्यास हे त्वरित डॉक्टरांना माहिती देईल. प्रोजेक्टचे वैद्यकीय सल्लागार लुकाज शार्पाक म्हणाले की, रिमोट कंट्रोल फीचरचा अर्थ यामुळे आरोग्य कर्मचारी रुग्णांच्या कमी संपर्कात येतील.
या योजनेचे संचालक लेस्जेक कोव्हालिक म्हणाले की, सर्वसाधारण व्हेंटिलेटरच्या तुलनेत याची किंमत खूपच कमी असेल. मात्र त्यांनी या डिव्हाईसची किंमत स्पष्ट केली नाही. या तंत्रज्ञानाची अद्याप चाचणी सुरू असून, पुढील काही महिन्यात हे व्हेंटिलेटर पोलंड आणि त्यानंतर जगभरात उपलब्ध होईल.