मुंबई : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने सोमवारी सर्व प्रकारच्या कर्जांसाठी मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट कमी केला आहे. एस बी आय ने 10 बेसिस पॉइंट कमी केले आहे. नवे दर मंगळवारपासून लागू होणार असून यानंतर कार आणि इतर एमसीएलआर लिंक्ड कर्जे स्वस्त होतील.
सध्याच्या चालू आर्थिक वर्षात एसबीआयने एमसीएलआरने सलग आठव्यांदा कपात केली आहे. एसबीआयने त्यांच्या वक्तव्यात सांगितलं की, फंडात कमी झालेल्या खर्चाचा फायदा ग्राहकांना देण्यासाठी आम्ही एमसीएलआरमध्ये 0.10 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता एसबीआयमध्ये एमसीएलआर वार्षिक 7.90 टक्के इतका होईल. जो आतापर्यंत 8 टक्के आहे. एसबीआयने सांगितलं की गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या मार्केट शेअरमधील 25 टक्के भागावर त्यांची पकड आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्याच आठवड्यात रेपो रेट कायम ठेवल्याचं सांगितलं होतं. एसबीआयचा हा निर्णय लोकांच्या फौद्याचा ठरू शकतो. यामुळे कर्ज स्वस्त होऊ शकणार आहे.