एकाच वर्षात तब्बल ५१५० कोटी रुपयाचे सेंद्रिय उत्पादनांची निर्यात

    दिनांक : 04-Dec-2019
Total Views |
मुंबई: सेंद्रिय शेती व उत्पादन संदर्भात खुश खबर समोर येत आहे. मागील वर्षभरात 5150 कोटी रुपयांच्या सेंद्रिय उत्पादनांची निर्यात केली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे देशात सेंद्रिय शेती तसेच सेंद्रिय उत्पादनांच्या निर्मितीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

ज_1  H x W: 0 x 
 
 
परंपरागत कृषी विकास योजना आणि पूर्वोत्तर भागातील सेंद्रीय शेती साखळी विकास मिशन अंतर्गत 2015-16 पासून भारत सरकार देशातील सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देत आहे. शेतकरी निर्माता संघटनांमार्फत या दोन्ही योजनांचा प्रचार करण्यात येत असून या दोन्ही योजना रसायनमुक्त आणि शाश्वत सेंद्रीय शेतीच्या प्रसार करणाऱ्या आहेत. तसेच बाजारपेठांशी जोडणीद्वारे कच्चा माल खरेदीलाही आधार देणाऱ्या आहेत.
2018-19 या वर्षात महाराष्ट्रातून इतर राज्यांसोबत सुमारे 1 कोटी 24 लाख 75 हजार क्विंटल इतके उत्पादन घेण्यात आले. तसेच 2018-19 मध्ये भारतातून सेंद्रीय शेतीतील 5150 कोटी 99 लाख रुपयांच्या उत्पादनांची निर्यात झाल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. सेंद्रीय शेतीला राष्ट्रीय कृषी विकास योजना तसेच फळबागा एकात्मिक विकास मिशन आदींच्या अंतर्गत पाठिंबा दिला जातो. रसायन युक्त बी बियाणे व खतासाठी सेंद्रिय शेती हा अतिशय चांगला पर्यावरण पूरक व आरोग्याच्या दृष्टीने चांगला पर्याय मानला जातो.